आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता विशाल ठक्करविरोधात EX-गर्लफ्रेंडचा बलात्काराचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता विशाल ठक्कर याच्याविरोधात एका अभिनेत्रीने शारीरिक शोषण, मारहाण आणि फसवणुकीचा आरोप करीत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार देणारी अभिनेत्री ठक्कर याची पूर्व प्रेमिका आहे. विशाल ठक्कर व संबंधित अभिनेत्री काही वर्षे 'लिव्ह इन रिलेशन' राहिले आहेत. ठक्कर सध्या फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
ठक्करविरोधात दिलेल्या तक्रारीत संबंधित अभिनेत्रीने म्हटले आहे की, माझी आणि ठक्करची ओळख 2013 मध्ये मड परिसरात शूटिंग दरम्यान झाली होती. त्यानंतर आम्ही एकत्र राहू लागलो. मात्र, त्यानंतर ठक्कर मला मारहाण करू लागला. त्याच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून मी वेगळी राहू लागली आहे. तरीही तो मला फोन करून त्रास देतो असे या अभिनेत्रीने तक्रारीत म्हटले आहे.