आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Gehna Vashist Beaten Up For Wearing Bikini With Indian Flag! ‎

तिरंगा गुंडाळून फोटोशूट करणा-या मॉडेलची नवी ड्रामेबाजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तिरंग्याचा अवमान करुन वादात अडकलेल्या गहना वशिष्टला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. झेंडा गुंडाळलेले फोटो लीक झाल्यानंतर लोकांनी मुंबईतील लोखंडवालाजवळ गहनाच्या कारची अडवणूक करुन तिला मारहाण केली आणि गाडीवर दगडफेकसुद्धा केली. या मारहाणीत गहनाच्या डोक्याला दुखापतही झाली. नंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्ट्रगलर गहनाचा पीआर म्हणून काम करणा-या संतोष राजने मीडियाला गहनाची हीच आपबीती सांगितली.
सुरुवातीला ही आपबीती खरीही वाटली. मात्र आता मुंबई मिररने संतोष राजने बनावट गोष्ट सांगितल्याचे प्रकाशित केले आहे. या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, भोजपुरी चित्रपटांच्या पब्लिसिटीचे काम बघणा-या राजने आपल्या क्लायंटला अर्थातच गहनाला प्रसिद्धीझोतात आणण्यासाठी विचारपूर्वक हा प्लान आखला होता.
तिरंगा गुंडाळून फोटोशूट करणा-या या मॉडेलची लोकांनी केली धुलाई