आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रांती रेडकर पाठिब्यांसाठी फेसबुकवर, स्पॉट फिक्सिंगमध्ये नसल्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘जत्रा’,‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या इतर चित्रपटांत काम केलेल्या अभिनेत्री क्रांती रेडकरचा आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याची बातमी वर्षभरापूर्वी एका वृत्तवाहिनीने दाखवली होती. त्यानंतर क्रांतीने चॅनलविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी बोरिवली येथील न्यायालयात होणार आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतीने चाहत्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी फेसबुकवर एक दीर्घ पत्र लिहिले आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात प्रसारमाध्यमांनी या बातमीस उचलून धरल्याने क्रांती तिच्या पालकांना वर्षभर मानसिक त्रास बदनामी सहन करावी लागली होती. त्यानंतर तिने तक्रार दिल्यानंतर संबंधित चॅनलविरोधात न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. फेसबुकवरील पत्रात क्रांतीने म्हटले आहे, ‘गेल्या पंधरा वर्षांपासून मी मराठी चित्रपट मालिकांत काम करत आहे. प्रामाणिकपणे काम केल्याने मला नेहमीच चाहत्यांची पसंती मिळाली आहे. माध्यमांनीदेखील नेहमीच माझ्या कामाची दखल घेतली आहे. पण गेल्या वर्षीच्या मे महिन्यातील एका घटनेने माझे आयुष्यच बदलले. एका हिंदी वृत्तवाहिनीने माझा फिक्सर क्रिकेटपटू श्रीसंतबरोबर मॅच फिक्सिंगध्ये सहभाग असल्याचे तसेच हॉटेलमधील रूममध्ये श्रीसंतबरोबर पकडल्याचे वृत्त प्रसारित केले. या वृत्ताच्या पडताळणीसाठीही मला त्या चॅनलने संपर्क साधण्याची तसदी घेतली नाही.
"त्या' दिवशी कोकणात होते : क्रांती रेडकर
ज्यादिवशी मी श्रीसंतबरोबर हॉटेलमध्ये पकडल्याचे या वाहिनीने म्हटले होते त्या वेळी मी कोकणमध्ये ‘काकण’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. वृत्तवाहिनीने चुकीच्या व्यक्तीस क्रांती रेडकर समजल्याने ही मोठी चूक घडली होती. मात्र, या एका चुकीमुळे इतर माध्यमांनीही ही बातमी प्रसारित केल्याने माझे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे. मानहानी, बदनामी, नैराश्य, पालकांचे खच्चीकरण या सगळ्यातून मी वर्षभर त्रास सहन करीत आहे. मला डॉक्टरांकडून उपचारही घ्यावे लागले, असे सांगत क्रांतीने या प्रकरणाची सुनावणी बोरिवली येथील न्यायालयात हाेणार असल्याचे सांगितले. तिच्या या आवाहनाला चित्रपट क्षेत्रातील काही मान्यवरांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा क्रांती रेडकरची ग्लॅमरस छायाचित्रे...