मुंबई - अभिनेत्री कृतिका चौधरी हत्या प्रकरणाचे गूढ वाढत असून तिचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडल्याने हत्येपूर्वी तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, ज्या तरुणाशी तिचे शेवटचे बोलणे झाले होते त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
कृतिका अंधेरी येथील भैरवनाथ इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहत होती. पाच दिवस तिचा फ्लॅट बंद असल्याने शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिचा मृतदेह आढळून आला होता. कृतिकाचे मोबाइल डिटेल्स पोलिसांनी मिळवले आहेत. यातील बहुतांश तरुण हे ड्रग्जच्या आहारी गेल्याचे समोर आले आहे.