मुंबई- हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री कृतिका चौधरीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कृतिका यांच्या अंधेरी येथील फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. तीन-चार दिवसांपूर्वी ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. २५ वर्षीय कृतिका मूळची हरिद्वारची असून अनेक मालिका, चित्रपटांमध्ये ती काम करीत होती. कंगनाबरोबर रज्जो चित्रपटातही कृतिकाने काम केले होते.
दरवाजा तोडून काढला मृतदेह
- कृतिका अंधेरीच्या चार बंगलो परिसरात भैरवनाथ SRA बिल्डिंगमध्ये राहत होती.
- घटनेच्या रात्री तरुणीबरोबर आणखी कोणीतरी होते असे संकेत घटनास्थळी मिळालेल्या वस्तूवरुन मिळत आहेत.
टीव्ही, एसी ठेवला सुरू
- पोलिस खोलीत आले त्यावेळी टीव्ही आणि एसी सुरू होता. मृतदेह लवकर सडू नये यासाठी मारेकऱ्याने एसी सुरू ठेवला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
- शेजाऱ्यांच्या मते तरुणी चित्रपटांत काम करायची आणि ते तिला परि नावाने ओळखायचे. तिच्याकडे नेहमी लोकांची वर्दळ सुरू असायची.
कंगनाबरोबर केला चित्रपट
- कृतिकाने कंगना रनोटबरोबर 'रज्जो' चित्रपटात काम केले होते.
- क्राइम सिरियल 'सावधान इंडिया'सह बालाजी प्रोडक्शनच्या अनेक सिरियलमध्ये ती झळकली होती..