आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Laila Khan Murder Case Criminal Parvez Tak Arrested

लोखंडी सळईने लैलाची हत्या; परवेझ टाकला पोलिस कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अभिनेत्री लैला खानची हत्या लोखंडी सळईने केल्याची कबुली तिचा सावत्र बाप परवेझ अहमद टाक याने पोलिसांकडे दिली. लैलाचा खून मालमत्तेसाठी केल्याचा आरोप परवेझवर आहे. मुंबई गुन्हे शाखेने त्याला जम्मूहून मुंबईत आणले. परवेझला आज किला कोर्टात हजर केले असता त्याला 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. लैला खान दुबईला गेली असल्याचा खोटा जबाब परवेझने यापूर्वी दिला होता.
लैलाची आई सलीना हिची हत्या करताना तिने मला पाहिले होते. त्यामुळे तिची हत्या करणे माझ्यासाठी गरजेचे होऊन बसले होते, असेही परवेझने टाकने पोलिसांना सांगितले.
यानंतर इगतपुरी येथील उंटदरीतील फार्म हाऊसचा रखवालदार शाकिर याला हाताशी घेऊन परवेझ याने संपूर्ण कुटूंबाला यमसदनी पाठविल्याचेही त्याने सांगितले. लैला तिच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह जमिनीत पुरल्यानंतर लैलाच्या फार्म हाऊसला आग लावल्याचेही त्याने जबाबात म्हटले आहे. परवेझ सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून रखवालदार शाकिर फरार आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मात्र परवेझ वारंवार आपला जवाब बदलत असल्याने त्याच्या जबाबावर विश्वास ठेवणार नसल्याचे गुन्हे अन्वेषण शाखेचे म्हणणे आहे. लैला खान आणि तीच्या कुटूंबीयांचा मृतदेह मिळत नाही, तोपर्यंत परवेझच्या कोणत्याही जबाबावर विश्वास ठेवता येणार नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
लैला खानचे उंटदरीतील फार्महाऊस आईच्या नावावर
बॉलिवूड अभिनेत्री लैला खानच्या ठावठिकाण्याचे गूढ कायम? अज्ञातस्थळी की खून?
EXCLUSIVE : दाऊदच्या इशा-यांवर नाचत आहे बॉलिवूड अभ‍िनेत्री लैला
पाक अभिनेत्री लैला खान लष्कर-ए-तोयबाच्या ताब्यात