आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Mamata Kulkarni Speaks On Drug Case In Solapur

2 हजार कोटींचे ड्रग्ज प्रकरण, थेट ममता कुलकर्णीशी बातचित, वाचा काय म्हणाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमधील मराठमोठी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी यांच्यावर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटमध्ये सामिल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2 हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणी ठाणे पोलिसांनी तिच्यावर संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात एका वृत्तवाहिनीने तिच्याशी संपर्क साधला. यावेळी तिने आरोप निराधार असल्याचे म्हटले. शिवाय यासंदर्भात लवकरच भारतात येणार असल्याचे सांगितले आहे.
2200 कोटींचे ड्रग्ज केलेय जप्त-
गुजरात एटीएसने 15 एप्रिल रोजी अहमदाबादच्या रिया इंडस्ट्रीजमध्ये छापा टाकून 270 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते.
- त्यानंतर ठाणे व सोलापूरची लिंक मिळाली.
- ठाण्यात टाकलेल्या धाडीत 2000 कोटींचे एफेड्रिन ड्रग्ज जप्त करण्यात आले.
- त्यानंतर सोलापूरातून 200 कोटींचे एफेड्रिन ड्रग्ज जप्त करण्यात आले.
- अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील मास्टरमाईंड पुनीत श्रींगी याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
- पुनीतने सांगितले की, एव्हॉन ऑरगॅनिक्स कंपनीचा एक संचालक मनिष जैन हा केनियात विकी गोस्वामीला अनेक वेळा भेटला आहे.
- पडकलेले 20 टन ड्रग्ज भारत, पोलंड आणि युरोपियन देशात पाठवले जाणार होते.
- हे ड्रग्ज मुंबईतून गुजरातमार्गे ईस्टर्न युरोपमध्ये पाठवले जाणार होते.
कोण आहे विकी गोस्वामी
- विकी गोस्वामीचा ड्रग्ज क्राईममध्ये लांबचा व मोठा इतिहास आहे.
- विकीला 1997 मध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक झाली होती. तेथे त्याला 15 वर्षाची शिक्षा झाली होती.
- ही शिक्षा उपभोगल्यानंतर विकीने ममता कुलकर्णीसोबत लग्न केले व तिला घेऊन केनियाची राजधानी नैरोबीत गेला आहे.
- तेथेही तो ड्रग्जच्या तस्करीत अडकला आहे. केनियातही त्याच्यावर अनेक केस सुरु आहेत.
- यूएस आणि ठाणे पोलिसांना या ड्रग्ज प्रकरणी विकी हवा आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, ड्रग्ज सिंडिकेटबाबत काय सांगितले ममता कुलकर्णीने... कोणते केले खुलासे... सध्या काय करत आहे केनियात....