Home | Bollywood | Marathi Cinekatta | Actress Priya Berde attempt sexual harassment in Mumbai

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग, मद्यधुंद सुनील जॉनीला अटक; सिनेमागृहातील प्रकार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 17, 2017, 05:57 PM IST

मराठी सिनेसृष्टीचे दिवंगत सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग झाल

 • Actress Priya Berde attempt sexual harassment in Mumbai
  मुंबई- मराठी सिनेसृष्टीचे दिवंगत सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग झाल्याचा खळखबजनक प्रकार समोर आला आहे. मीरारोड येथील एका सिनेमागृहात शनिवारी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनील जॉनी याला अटक केली आहे.

  आधी तर त्याच्या थोबाडीत लगावली....
  प्रिया बेर्डे यांनी सांगितले की, 'शनिवारी मुलीसोबत मी सिनेमा पाहायला गेले होते. आरोपी आणि त्याचे तीन मित्र तिथे उभे होते. ते मद्यधुंद अवस्थेत होते. त्यातील एकजण माझ्याकडे एकसारखा पाहात होता. संध्याकाळी 5.30 वाजेचे शो सुरु झाल्यानंतर आरोपींनी गोंधळही घातला. मात्र, इतर प्रेक्षकांनी त्यांना हटकल्यानंतर ते बाहेर गेले. नंतर एक जण सिनेमागृहात परत आला. माझ्या खूर्चीपासून एक खूर्ची सोडून तो बसला. तो माझ्या कमरेला स्पर्श करत असल्याचे लक्षात आल्याचे जाणवले. त्याचा हात पकडून आधी त्याच्या थोबाडीत लगावली.
  सिनेमागृहात गोंधळ घालणारा आणि हे कृत्य करणारा एकच व्यक्ति असल्याचे समजले. आरडाओरड करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच तो धक्का देऊन पळला. नंतर मॉलमधील सुरक्षरक्षकाच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या सगळ्या प्रकारामुळे माझ्या मुलीला प्रचंड धक्का बसला आहे.'
  आरोपी सुनील जॉनी (वय-43) हा बोरीवली रहिवासी असून तो बिझनेसमन असल्याची माहिती मिळाली आहे. काशीमिरा पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trending