आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जाधीश CEO ला भेटायला हेलिकॉप्‍टरने आली होती मल्लिका; घेतला पार्टीचा आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्‍नी नताशासोबत अदार. इनसेट मल्लिका. - Divya Marathi
पत्‍नी नताशासोबत अदार. इनसेट मल्लिका.
मुंबई - पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती सारस पूनावाला यांनी दक्षिण मुंबईतील ब्रीच कॅंडीस्थित लिंकन हाऊस ही हेरिटेज दर्जा असलेली इमारत तब्बल ७५० कोटी रुपयांत खरेदी करण्याचा व्यवहार केला आहे. ही इमारत आत्तापर्यंत अमेरिकन दूतावासाच्या मालकीची होती. मुंबईतील मालमत्तेचा हा सर्वात मोठा व्यवहार शनिवारीच पूर्ण झाल्याची माहिती पुनावाला यांनी दिली. ते या इमारतीचा निवासासाठीच उपयोग करणार आहेत. पूनावाला हे 53 हजार कोटी रुपयांचे मालक असून, भारतातील आठव्‍या तर जगातील 208 क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्‍यक्‍ती आहेत. त्‍यांना ज्‍या प्रमाणे महागड्या कार, बंगले आणि हॉर्स रेसची आवड आहे. अगदीच तशीच आवड त्‍यांचा मुलगा अदार यांनाही आहे. अदार यांच्‍या पार्टीजसाठी मोठ्या बिजनेसमॅनपासून ते बॉलीवुड स्टार्स येतात. अदार यांच्‍यामुळे काही वर्षांपूर्वी बॉलीवुड अॅक्ट्रेस मल्लिका शेरावत हीसुद्धा चर्चेत आली होती.

हेलिकॉप्टरने भेटायला आली होती मल्लिका
काही वर्षांपूर्वी अदार यांनी त्‍यांच्‍या पुण्‍यातील स्टड फार्ममध्‍ये हॉर्स रेस आणि पार्टी ऑर्गनाइज केली होती. त्‍यासाठी मल्लिका शेरावत यांना आंमत्रित केले गेले होते. या पार्टीसाठी मल्लिका ही हेलिकॉप्टरने आली होती. हेलिकॉप्‍टर लँड होताच अदार हे त्‍यांची कोट्यवधी रुपये किंमत असलेली रॉल्स रॉयस ही कार घेऊन तिला घ्‍यायला आले होते. या पार्टीमध्‍ये मल्लिका हिने खूप एन्जॉय केले. दरम्‍यान, अदार आणि मल्लिका यांच्‍या डेटिंगबाबत चर्चाही झाली होती.
सीईओ आहेत अदार
अदार पूनावाला हे त्‍यांच्‍या वडिलांची कंपनी सीरमचे काम पाहतात. ते सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत. त्‍यांनी लंडनच्‍या वेस्टमिनिस्टर यूनिवर्सिटीमधून मॅनेजमेंटची पदवी घेतली. नताशासोबत त्‍यांचे लग्‍न झाले. वडिलांप्रमाणेच त्‍यांच्‍या नावावर अरबो रुपयांची संपत्‍ती आहे.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...