आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे अब्‍जाधीश CEO ची Wife, अंबानीपासून बिग बीच्‍या पार्टीजला लावते हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती अदारसोबत नताशा. - Divya Marathi
पती अदारसोबत नताशा.
मुंबई - दक्षिण मुंबईतील लिंगन हाऊस हा बंगला प्रसिद्ध उद्योगपती साइरस पूनावाला यांनी 750 कोटी रुपयांना विकत घेतला. काहीच दिवसांत आपल्‍या कुटुंबासह ते तेथे राहायला जाणार आहेत. 53 हजार कोटी रुपयांच्‍या संपत्‍तीचे मालक असलेल्‍या साइरस यांच्‍या कुटुंबामध्‍ये मुलगा अदार, सून नताशा आणि नातू आहे. साइरस आणि अदार यांना महागड्या कार आणि हॉर्सरेसचा छंद आहे तर नताशा या फॅशन स्टेटमेंट आणि पेज 3 पार्टीजसाठी प्रसिद्ध आहेत. अंबानी, बिग बीपासून ते सलमान खानच्‍या पार्टीजमध्‍ये त्‍या नेहमीच दिसतात.
2006 मध्‍ये झाले लग्‍न
2006 मध्‍ये पुणे येथे नताशा आणि अदार यांचे लग्‍न झाले. त्‍यांच्‍या लग्‍नसोहळ्यात महाराष्ट्रचे तत्कालीन मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख, राष्‍ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार, फारुख अब्दुल्ला, प्रफुल पटेल, लिकर किंग विजय माल्या यांच्‍यासह सर्वच क्षेत्रातील प्रसिद्ध व्‍यक्‍तींनी हजेरी लावली होती.
लंडनमध्‍ये घेतले शिक्षण
नताशा यांनी लंडनच्‍या प्रसिद्ध 'लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स'मधून पदवीचे शिक्षण घेतले. अदारसोबत त्‍यांची पहिली भेट लंडनमध्‍ये झाली. त्‍यावेळी अदार हे लंडनच्‍या वेस्टमिनिस्टर यूनिवर्सिटीमध्‍ये शिक्षण घेत होते.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा नताशा यांचे निवडक फोटोज...