आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adarsh Co operative Housing Society News In Marathi

कोर्टात निकाल लागेपर्यंत आदर्श सोसायटी अंधारातच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आदर्श सहकारी गृहनिर्माण सोसायटीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत या इमारतीस वीज आणि पाणी देण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठाम नकार दिला असून आदर्श इमारतीचे भवितव्य आणखी काही वर्षे अंधारमय असेल.
दक्षिण मुंबईच्या कुलाबा या उच्चभ्रूंच्या परिसरात 31 मजली आदर्श इमारत उभी आहे. ज्या कफ परेड परिसरात आदर्श आहे तेथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) अधिकारता आहे. एमएमआरडीएने आदर्शला दिलेले भोगवटा प्रमाणपत्र रद्द केले आहे.
आदर्श सोसायटीने वीज-पाणी जोडणीसंदर्भात जानेवारी 2013 मध्ये मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. सचिवांनी त्याबाबत मुंबई पालिकेकडे विचारणा केली. त्यावर पालिकेच्या वीज (बेस्ट) विभागाने न्यायालयीन वादामुळे जोडणी देणे शक्य नसल्याचे कळवले आहे, तर पालिकेच्याच पाणीपुरवठा विभागाने भोगवटा प्रमाणपत्र (एनओसी) नसल्याने जोडणी देता येणार नाही, असा अहवाल दिल्याची माहिती बृहन्मुंबई पालिकेतील सूत्रांनी ह्यिदव्य मराठीह्णला दिली.आदर्श इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा अधिकार एमएमआरडीएचा आहे. सोसायटीने इमारतीची उंची, मंजूर चटई क्षेत्र आणि समुद्री नियमन क्षेत्र आदी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे एमएमआरडीने दिलेले भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.

दृष्टिक्षेपात आदर्श
चार माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, दोन माजी मंत्री आणि १२ सनदी अधिकारी यांचा आदर्श घोटाळ्याशी संबंध.

मंत्री, आमदार, खासदार, सनदी-लष्करी अधिकारी अशा २२ सदस्यांना आदर्शमधून अपात्र ठरवण्यात आले आहे. "आदर्श'मध्ये २२ सदनिकाधारक बेनामी सापडले असून या सदनिकांचे खरे मालक वेगळेच आहेत.