आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adarsh Housing Society Scam, Cbi Inquiry Of Ashok Chavhan

आदर्श: अशोक चव्हाणांची होणार CBI चौकशी, \'भाजपचे हे सूडाचे राजकारण\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशोक चव्हाण यांच्या मानगुटीवर आदर्श घोटाळ्याचे भूत कायम बसलेले दिसत आहे. - Divya Marathi
अशोक चव्हाण यांच्या मानगुटीवर आदर्श घोटाळ्याचे भूत कायम बसलेले दिसत आहे.
मुंबई- मुंबईतील बहुचर्चित आदर्श घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सीबीआय चौकशी होणार असल्याचा दावा भाजपचे खासदार किरीट सौमय्या यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर चव्हाण यांच्या सीबीआय चौकशीला राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि फडणवीस सरकारनेही परवानगी दिल्याचे सोमय्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजप या प्रकरणी सूडबुद्धीचे राजकारण करीत आहे. 2013 साली तत्कालीन राज्यपाल यांनी सर्वोच्च कायदेतज्ज्ञांचं मत विचारात घेऊन सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली होती. मग आता पुन्हा पुन्हा तेच मुद्दे का उगळले जात आहे. भाजप सुडाचे राजकारण करीत आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी याप्रकरणी दिली आहे.
2010 साली राज्यासह देशात गाजलेल्या आदर्श घोटाळा प्रकरणामुळे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. महसूल मंत्री असताना व मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या पदाचा वापर करून आपल्या नातेवाईकांना सदनिका दिल्याचा आरोप अशोक चव्हाण यांच्यावर झाला होता. याप्रकरणी राज्य सरकारने चौकशीसाठी जस्टीस पाटील आयोग नेमला होता. या आयोगाच्या अहवालात नेत्यांनी पदाचा गैरवापर करीत आपले वजन वापरून फायदा घेतल्याचे नमूद केले होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासह इतर काही नेत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी अशोक चव्हाण यांच्या सीबीआय चौकशीस परवानगी नाकारली होती.
ही परवानगी नाकारण्यामागे काँग्रेस नेतृत्त्व होते व राहुल गांधींच्या आदेशानेच चव्हाणांना वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, अशोक चव्हाण यांच्या भूमिकेबाबत सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी सीबीआयला पत्र लिहून केली होती. याप्रकरणी सीबीआयने पुन्हा एकदा राज्यपाल व राज्य मंत्रिमंडळाची परवानगी मागितली आहे. आता केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपचे सरकार आले आहे. विरोधी पक्ष सत्ताधारी असल्याने चव्हाणांना अडचणीत आणण्यासाठी राजकारण होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्यांनी केलेला दावा व राज्यपालांसह राज्य सरकारने चव्हाणांच्या सीबीआय चौकशीला परवानगी दिल्याची त्यांची माहिती यातून हे सारे स्पष्ट होत आहे. अशोक चव्हाण व काँग्रेस याबाबत काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.