आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adarsh Housing Society Scam News In Marathi, Shivajirao Nilangekar, Divya Marathi

आदर्श घोटाळाप्रकरण: न‍िलंगेकरांच्या याचिकेवर हस्तक्षेप करण्‍यास न्यायालयाचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हस्तक्षेप करण्यास सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बुधवारी नकार दिला. या घोटाळ्यातून आपले नाव वगळावे, अशी मागणी करणारा अर्ज शिवाजीराव पाटील िनलंगेकर यांनी न्यायालयात दाखल केला होता. याप्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्याची मािहती यािचकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी दिली आहे.

िनलंगेकर महसूलमंत्री असताना त्यांनी आदर्श इमारतीला नियमबाह्य परवानग्या िदल्या. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्याची मागणी वाटेगावकर यांनी यािचकेत केली आहे. त्याला निलंगेकरांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता.