आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आदर्श’मध्ये बेनामी फ्लॅट काेणाचे; चौकशीचे निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटीप्रकरणी तपास करून दोन वर्षांपूर्वीच अहवाल सादर केला आहे, असे सीबीआयने सांगूनही मुंबई उच्च न्यायालयाचे चौकशीवर समाधान झाले नाही. त्यामुळे आदर्शमधील बेनामी फ्लॅट्सची आणखी चौकशी करा, असे निर्देश बुधवारी सीबाआयला दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांच्या जनहित याचिकेची सुनावणी करताना न्या. ए. एस. ओक आणि न्या. ए.ए. सय्यद यांनी हे निर्देश दिले. वरिष्ठ नोकरशहा आणि राजकीय नेत्यांचे आदर्शमध्ये बेनामी फ्लॅट्स आहेत.

सर्व नियम धाब्यावर बसवून आदर्श इमारतीला सर्व प्रकारच्या परवानग्या देण्याच्या बदल्यात हे फ्लॅट्स देण्यात आल्याचा आरोप या याचिकेत आहे. सीबीआयचे दोन चौकशी अहवाल स्वीकारण्यास उच्च न्यायालयाने यापूर्वी नकार दिला होता. हे अहवाल पाहिले असता तपास अधिकाऱ्याने डोकेच वापरले नसल्याचे दिसते. चौकशीवर आम्ही समाधानी नाही. त्यामुळे बेनामी फ्लॅट्सबाबत आणखी चौकशीचे निर्देश आम्ही देत आहोत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...