आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adarsh Scam: Commission Likely To Submit Final Report This Week

‘आदर्श’चा अंतिम अहवाल आठवडाभरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आदर्श घोटाळ्याची गेल्या दोन वर्षांपासून चौकशी करत असलेला दोन सदस्यीय समिती आयोग आपला अंतिम अहवाल आठवड्यात सरकारकडे सादर करण्याची शक्यता आहे. आयोगातील वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिली.
उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जी. ए. पाटील चौकशी आयोगाचे अध्यक्ष आहेत. जर या आठवड्यात अहवाल सादर झाला तर अधिवेशन संपण्यापूर्वी तो विधिमंडळात मांडला जाण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, या अहवालावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.