आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श घोटाळ्याप्रकरणी पाटील चौकशी आयोगाचा अहवाल पुढील महिन्यात येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रासह देशात गाजलेल्या आदर्श सोसायटी प्रकरणाची चौकशी आयोगाने पूर्ण केला असून, याबाबतचा अंतिम अहवाल फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात राज्य सरकारकडे सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.
निवृत्त न्यायाधिश जे. ए. पाटील यांच्या चौकशी आयोगाने आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी एकून २१४ जणांची साक्ष नोंदवून हा अहवाल तयार केला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या या चौकशी आयोगाने गेल्या वर्षी संरक्षण विभागाने सादर केलेल्या अहवालाकडे दुर्लक्ष करीत त्यांचा दावा फेटाळला आहे. पाटील यांच्या अहवालात, आदर्श सोसायटीची जागा ही संरक्षण खात्याची नसून ती राज्य सरकारची असल्याचेच म्हटले आहे. तसेच ही जागा कारगिल युद्धातील शहिदांच्या विधवा, नातेवाईक यांच्यासाठी राखीव नसल्याचेही अहवालात आयोगाने म्हटल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आदर्श सोसायटीच्या इमारत बांधकामासाठी परवानगी देताना वेगवेगळ्या विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांनी नियमांचे उल्लंघन केले असल्याचा ठपका ठेवला आहे.
आयोगाने एकूण जे २१४ साक्षीदार तपासले त्यात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह दिवंगत माजी मुख्यमंत्री विलसराव देशमुख, आदर्श सोसायटीमुळे राजीनामा द्यावा लागलेले अशोक चव्हाण, लष्करातील माजी वरिष्ठ अधिकारी एन. सी. वीज आणि दिपक कपूर, भारतीय प्रशासन सेवेतील अनेक अधिकारी आणि राज्य आणि केंद्र सरकारमधीलही अनेक अधिका-यांची चौकशी पाटील आयोगाने केली आहे. या प्रकरणात अशोक चव्हाण प्रमुख आरोपी असून त्यांना अद्याप अटक झालेली नाही.