आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adarsh Society News In Marathi, Mumbai High Court, Divya Marathi

आदर्श सोसायटीची मालकीहक्काला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संरक्षण मंत्रालयाने दाखल केलेल्या आदर्श सोसायटीच्या मालकीहक्काला विरोध करणारी आदर्श सोसायटीची याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. न्यायमूर्ती रोशन दळवी यांच्या खंडपीठापुढे याबाबत शुक्रवारी सुनावणी झाली.
कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श इमारतीची जागा ही आपल्या मालकीची असल्याचे सांगत संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्य सरकारच्या उच्चपदस्थ अधिका-यांनी घोटाळा करून ही जागा आदर्श सोसायटीच्या नावावर केली. तसेच येथील बांधकाम हे नियम धाब्यावर बसवून करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने आपल्या याचिकेत म्हटले आहे.