आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adarsh Society Scam Vilasrao Deshmukh And Sushilkumar Shinde Inquery Report

विलासराव देशमुख, शिंदेंबाबतचा अहवाल सादर करा : हायकोर्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आदर्श घोटाळा प्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदेबाबतचा चौकशी अहवाल 29 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला दिले. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला.
सीबीआयने विलासराव आणि शिंदे यांची आदर्शबाबत चौकशी केली होती. गेल्या महिन्यांत याबाबत आरोपपत्र दाखल करून अशोक चव्हाणांसह 13 जणांना आरोपीच्या पिंजºयात उभे करण्यात आले होते. मात्र, विलासराव देशमुख आणि शिंदे यांचे नाव नव्हते. त्यावर वाटेगावकर यांनी या दोघांबाबतच्या चौकशीचा अहवाल उघड करण्याची विनंती केली होती. दरम्यान, या दोघांविरोधात सीबीआय कोर्टात जाण्याचे निर्देशही न्यायालयाने वाटेगावकर यांना दिले आहेत.