आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूड अॅक्टरची \'भाभी\', माजी मुख्यमंत्र्यांची सून आणि आमदाराची पत्नी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती अमित देशमुखसोबत आदिती देशमुख - Divya Marathi
पती अमित देशमुखसोबत आदिती देशमुख
मुंबई- लातूरचे कॉंग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची पत्नी आदिती देशमुख यांनी काही वर्षे मॉडेलिंग केले होते. हे कदाचित खूप कमी लोकांना माहीत असावे. अमित महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहे तर पत्नी एके काळी टेलीव्हिजनच्या दुनियेत प्रसिद्ध होत्या. आज, 20 सप्टेंबरला आदिति देशमुख यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त आम्ही आपल्याला आदिति व देशमुख फॅमलीविषयी माहिती घेऊन आलो आहे.

बॉलीवूड अॅक्टरची 'भाभी', माजी मुख्यमंत्र्यांची सून आणि आमदाराची पत्नी
आदिती या राजकारणात सक्रीय नाहीत. मात्र, आमदार पतीसोबत त्या राजकीय कार्यक्रमात नेहमी सहभागी होत असतात. आदिती यांचे सासरे दिवंगत विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते. आदिती या बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याची वहिणी आहे.

सात वर्षे केली मॉडेलिंग...
अमित यांच्यासोबत विवाह करण्यापूर्वी अदिती यांनी सात वर्षे मॉडेलिंग केली. अनेक टीव्ही सीरियलमध्येही काम केले. मॉडेलिंगदरम्यान त्यांची भेट अमित देशमुख यांच्याशी झाली.

आदितीचे वडील मोठे बिझनेसमन
आदितीचे वडील हे मोठे बिझनेसमन आहेत. काही वर्षांपूर्वी ते मुंबईहून बंगळुरुला स्थायिक झाले आहेत. देशमुख फॅमिलीसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

पुढील स्लाइड्सवर वाचा,बॉलीवूड अॅक्टरची 'भाभी', माजी मुख्यमंत्र्यांची सून आणि आमदाराची पत्नी आदिती देशमुख यांचे निवडक फोटोज...