आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aditya Pancholi Fight With Neighbor Cctv Footage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा कशाप्रकारे आदित्य पांचोलीने शेजार्‍याला केली मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिया खानच्या आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेला आदित्य पांचोली परत एकदा वाईट कृत्यामुळे चर्चेत आला आहे. त्याच्यावर शेजार्‍याला मारहाण केल्याला तसेच धमकी देण्याचा आरोप लावण्यात आला आहे. आदित्य पांचोली सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये एका वयस्कर व्यक्तीला मारताना स्पष्ट दिसत आहे.

मुंबई पोलिसांनी हे स्पष्ट केले आहे की, अभिनेता आदित्य पांचोलीने शेजारी पटेल यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पटेल यांच्या अर्जावरून पोलिसांनी आदित्य पांचोलीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 48 वर्षीय आदित्य पांचोलीने भार्गव पटेल नावाच्या व्यक्तीला मारहाण केली. शिक्षकी पेशा असलेले भार्गव पटेल 55 वर्षांचे आहेत. वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरनुसार सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज पुराव्याच्या स्वरुपात जमा करण्यात आले आहे.

या भांडणाची सुरुवात पार्किंगच्या मुद्यावरून सुरु झाली आणि त्यानंतर आदित्य पांचोलीने भार्गव पटेल यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली व त्यांना मारहाण केली.