आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिया खानबाबत प्रश्न विचारल्याने अभिनेता आदित्य पांचोलीची महिला पत्रकारास मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता आदित्य पांचोली याने मंगळवारी एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकारास मारहाण केल्याचे वृत्त आहे. अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूप्रकरणी आदित्यचा मुलगा सूरज संशयाच्या भोवर्‍यात अडकलेला आहे.
जियाच्या आईने नुकतीच उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आपल्या मुलीचा खून झाला आहे, असा दावा केला आहे. दरम्यान, याबाबत झी वृत्तवाहिनीच्या पत्रकार उनैजा खान यांनी मंगळवारी आदित्यला विचारणा केली असता तो चिडला.
खान यांना धक्काबुक्की करत आदित्यने कारचा दरवाजा जोरात लावून घेतला. यात पत्रकार खान यांच्या हाताला दुखापत झाली. काही दिवसांपूर्वीच आदित्यवर शेजार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.