आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aditya Thackeray Denies Fielding Candidate Against Narendra Modi, Rajnath Singh

शिवसेनेचे भाजपच्या विरोधात उमेदवार; यूपी, बिहार, दिल्लीत आमने-सामने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप आणि शिवसेना यांची युती महाराष्ट्रात गेली 30 वर्षे असेल पण महाराष्ट्राबाहेर सेना आपले उमेदवार भाजपच्या विरोधात उतरवणार आहे. शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये 20 जागांवर, दिल्लीत 5 जागांवर तर बिहारमध्ये 7 उमेदवार देणार आहे. शिवसेना नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीत उमेदवार देणार असल्याची चर्चा होती. मात्र, युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी टि्वट करून मोदींच्या विरोधात सेना उमेदवार देणार नसल्याचे म्हटले आहे. शिवसेनेने मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह लखनौत लढत असल्याने त्यांच्याविरोधातही सेना उमेदवार उभा करणार नाही असे आदित्य ठाकरे यांनी टि्वट केले आहे.
शिवसेना-भाजप युती महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे आहे. मात्र, ही युती या राज्यापुरतीच आहे. अनेक प्रादेशिक राष्ट्रीय पक्षांशी युती, आघाडी करतात मात्र ती स्थानिक किंवा राज्य स्तरावरच असते. त्याचप्रमाणे भाजप आणि शिवसेना यांची युती देशभर नसून महाराष्ट्रापुरती आहे. त्यामुळे शिवसेना यूपीत 20, बिहारमध्ये 7 तर दिल्लीत 5 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही राज्यात काँग्रेस सोबत आघाडी केली आहे. मात्र, गोवा, गुजरात व इतर राज्यात राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधात उमेदवार उभे केले आहेत. आता शिवसेनाही यूपी, बिहार, दिल्लीत भाजपाविरोधात आपले उमेदवार उभे करणार आहे. याचबरोबर सेनेची ताकद गुजरातमध्ये असल्याने तेथेही लोकसभेसाठी उमेदवार उभे करण्याचा विचार शिवसेना करीत आहे.