आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंनी लावली प्रथमच हजेरी, शासकीय योजनेलाही दिले नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होताना तो ऐकण्यासाठी शुक्रवारी पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्याने विधिमंडळात हजेरी लावली. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूर्णवेळ सभागृहात बसून हा अर्थसंकल्प ऐकत राजकीय प्रक्रियेत शिकण्यात आपला रस दाखवून दिला.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सभागृहात येण्यापूर्वी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे विधानसभेतील अतिथींसाठीच्या दर्शक दीर्घेत दाखल झाले. पहिल्या रांगेत बसून त्यांनी संपूर्ण भाषण गंभीरतेने ऐकले. त्यांच्या पाठीमागे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकरही होते. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाला एखाद्या वेळेस भेटी दिल्याच्या आठवणी जुने-जाणते लोक सांगतात. मात्र दर्शक दीर्घेत बसून राज्याचा अर्थसंकल्प ऐकणारे अादित्य हे ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य ठरले.
ठाकरेंच्या नावाची पहिल्यांदाच योजना : गेल्या वर्षी अर्थसंकल्पात संघ आणि भाजप परिवारातील अनेक दिग्गज नेत्यांच्या नावाने योजना सुरू करण्यात आल्या होत्या. शिवसेनेच्या एकाही नेत्याच्या नावाने योजना जाहीर करण्यात आली नव्हती. या वेळीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासोबतच नागपुरातील संघ परिवारातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमतीताई सुकळीकर यांच्या नावाने उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना जाहीर केली. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ग्रामपंचायत व महिला सक्षमीकरण अभियान ही याेजना जाहीर करून मुनगंटीवारांनी शिवसेनेला खुश केले.

मुनगंटीवारांची काव्यमैफल
गेल्या वर्षी तब्बल दोन तास अर्थसंकल्पीय भाषण ठोकणाऱ्या मुनगंटीवारांना या वेळेस केवळ एक तासात भाषण उरकण्यास सांगण्यात आले होते. १ तास ४० मिनिटांत त्यांनी भाषण संपवले खरे, मात्र या भाषणात त्यांनी अनेक कविता आणि शेर यांची पेरणी केल्याने अनेकदा त्यांना टाळ्यांची दाद मिळाली. या कविता आणि शेरांच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे घेतले.

पाच कोटी आणि हास्यकल्लोळ
छत्रपती शिवरायांची महानता सांगत मुनगंटीवारांनी त्यांचे गोडवे गायले. त्यानंतर महाराजांची राज्याबाहेर स्मारके उभारणाऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, असेही जाहीर केले. यासाठी ५ कोटींची तरतूद केल्याची त्यांनी घोषणा करताच या तुटपुंजी तरतुदीवर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

निळे जॅकेट आणि देव
निळे जॅकेट आणि कपाळावर टिळा लावलेले मुनगंटीवार सभागृहात आले तेव्हा माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी त्यांची फिरकी घेतली. ‘मी आपल्या घरी फोन केला तेव्हा तुम्ही देवांचे आशीर्वाद घ्यायला गेल्याचे कळले. किती देवी-देवतांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही आलात?,’ असा प्रश्न पाटील यांनी विचारताच सभागृहात खसखस पिकली.
स्वातंत्र्यसैनिकांच्या घरासाठी अर्थसाहाय्य
१. स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची हयात पत्नी अथवा निकटवर्तीयांच्या नावे घरे नसल्यास त्यांना राहत्या गावात घरे घेण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
२. पोषण आहारासाठीच्या डॉ. अब्दुल कलाम योजनेसाठी ११२.६५ काेटींची तरतूद. योजनेची व्याप्ती वाढवून आदिवासी गरोदर, स्तनदा माता व ३ ते ६ वयोगटातील बालकांना सकस आहार.
३. आदिवासी युवकांसाठी पालघर येथे एकलव्य क्रीडा व उद्योजकता प्रबाेधिनी उभारण्यासाठी २५ कोटी.
४. वारली कलेची जोपासना व संवर्धनासाठी वारली हट. यासाठी केंद्र व राज्याकडून ६० कोटी.
बातम्या आणखी आहेत...