आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माय वाढेना बाप जेऊ घालेना; अादित्‍य ठाकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानासोबत चर्चा करताना आदित्‍य ठाकरे - Divya Marathi
पंतप्रधानासोबत चर्चा करताना आदित्‍य ठाकरे
मुंबई / नवी दिल्‍ली - शिवसेनेना सत्‍तेत आली तर प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला टॅब दिला जाईल, असे आश्‍वासन उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, प्रत्‍यक्ष सत्‍तेत सहभागी झाल्‍यानंतर राज्‍यातील भाजप नेत्‍यासोबत असलेल्‍या मतभेदामुळे शिवसेनेला आपल्‍या आश्‍वासनांची पूर्तता करताना दमछाक होत आहे. परिणामी, माय वाढेना बाप जेऊ घालेना, अशी त्‍यांची अवस्‍था झाली आहे. त्‍यामुळे आश्‍वासनांची पूर्तता व्‍हावी, यासाठी शिवसेनेच्‍या युवा सेनेचे प्रमुख आदित्‍य ठाकरे यांनी आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सर्वच विद्यार्थ्‍यांना टॅब देण्‍याची मागणी केली.
...तर दहा किलोचे दप्‍तर अडीचशे ग्रॅमवर
दिवसेंदिवस दप्‍तराचे ओझे वाढत आहे. त्‍यामुळे चिमुकल्‍या विद्यार्थ्‍यांना पाठीचा त्रास सहन करावा लागत आहे. मत्र, पुस्‍तकांऐवजी टॅबमध्‍ये सर्व पुस्‍तके पीडीएफ स्‍वरुपात सेव्‍ह केल्‍यास दहा किलो दप्‍तराचे ओझे केवळ अडीचशे ग्रॅम एवढेच होईल. त्‍यामुळे यावर उपाय म्‍हणून शासनाने प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला टॅब द्यावा, असे आदित्य ठाकरे पंतप्रधानांना म्‍हणाले.