आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील पाच हजार शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन- शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता व त्यांचे शैक्षणिक नुकसान राज्य सरकारला करायचे नाही. त्यामुळेच दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ५,००२ शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी स्पष्ट केले. कमी पटसंख्या असलेल्या शाळांचा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला. यात राज्यातील एकूण शाळांपैकी ५,००२ शाळांमधील मुलांची पटसंख्या ० ते १० यादरम्यान आहे. 

 

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद करण्यात येत नसून त्यातील विद्यार्थी व शिक्षकांचे जवळच्याच शाळेत समायोजनाबाबत मंत्रालयात  पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.   या वेळी तावडे यांनी समायोजन करताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे महत्त्वाचे असून शिक्षकांच्या नोकरी किंवा बदलीचा प्रश्न उद््भवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. आज अनेक शाळा डोंगराळ आणि दुर्गम भागात आहेत, जेथे विद्यार्थी संख्या शुन्य असली तरी शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. एकूण ५,००२ शाळांपैकी ४,३५३ शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत.  जिल्हा परिषद शाळांत एकूण ८,०७२ शिक्षक आहेत. खासगी अनुदानित शाळा ६९ आहेत. खासगी अनुदानित शाळांमध्ये २२० शिक्षक आहेत. अशा एकूण ० ते १० पटसंख्या असलेल्या एकूण ४,४२२ शाळा आहेत. या शाळांमधून २८,४१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उर्वरित ५८० शाळा या आदिवासी, विनाअनुदानित, सामाजिक न्याय, स्वयंअर्थसहाय्यित या प्रकारात मोडतात, तर २,०९७ शाळांचे स्थलांतर होऊ शकते. मात्र, त्यांना वाहनांची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

 

सर्वेक्षणादरम्यान ९०९ शाळा स्थलांतरित करता येणार नाही, असे लक्षात आल्याने या शाळा बंद करण्यात येणार नाही.  कमी गुणवत्तेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ठेवून त्यांचे शैक्षणिक नुकसान शालेय शिक्षण विभागाला करायचे नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १,३१४ शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येत असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.   

 

तणावमुक्त परीक्षा देता यावी यासाठीच नियम
दहावी आणि बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असते. या परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ११ वाजताच्या पेपरसाठी अर्धा तास अगोदर परीक्षावर्गात येणे अपेक्षित आहे.  या अर्ध्या तासात परीक्षागृहात विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट तपासणे, प्रश्नपत्रिका देणे असे करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांवरील परीक्षेपूर्वी ताण कमी करून अर्धा तास अगोदर वर्गात सोडून बरोबर ११ वाजता परीक्षा सुरू करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ११ नंतर म्हणजेच साधारण ३१ मिनिटांनी उशिरा आल्यावर परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षागृहात प्रवेश करताना विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये आणि विद्यार्थ्यांना तणावमुक्त पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठी  परीक्षा मंडळाने हा निर्णय घेतला आहे. अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितालाच प्राधान्य देण्यात येईल, असेही तावडे म्हणाले.

 

१,३१४ शाळांची वर्गनिहाय आकडेवारी  
मुंबई विभाग मुंबई उपनगर : १ ठाणे- ४५ पालघर- ३२ रायगड- 
१०३ नाशिक विभाग जळगाव : ८ धुळे- ९ नंदुरबार- ५ नाशिक- ३१ 
पुणे विभाग पुणे : ७६ सोलापूर- २१ अहमदनगर- ४९
कोल्हापूर विभाग कोल्हापूर : ३४रत्नागिरी- ९१२ सांगली- १६ सातारा- ७३ सिंधुदुर्ग- १५५   
औरंगाबाद विभाग औरंगाबाद : ४० जालना- ६ परभणी- १४ बीड- २३ हिंगोली- ४    
लातूर विभाग लातूर : ८ उस्मानाबाद- ७ नांदेड- ६८   
अमरावती विभाग अमरावती : ४९ अकोला- १८ वाशीम- ९ यवतमाळ- ३० बुलडाणा- ८
नागपूर विभाग नागपूर : २४ वर्धा -२९ भंडारा -१२ गोंदिया- ३२ चंद्रपूर -५३ गडचिरोली -४२

बातम्या आणखी आहेत...