आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Administration Ready For Face To The Strike Chief Secreatary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपाला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज - मुख्‍य सचिव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कामगार संघटनांनी 20 व 21 फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या संपाला तोंड देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. गुरुवारपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी ‘बेस्ट’च्या साहाय्याने पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे आदेश मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया यांनी सोमवारी दिले. तसेच वीज, पाणीपुरवठा, आदी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याच्या सूचनाही मुख्य सचिवांनी संबंधित विभागांना दिल्या. राज्यात बंदच्या काळात जनजीवन विस्कळीत होऊ नये, याबाबत काळजी घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सोमवारी संबंधित अधिका-यांनी विशेष बैठक घेतली.

संपाच्या काळात पाणीपुरवठा, दूध पुरवठा, आरोग्य, वाहतूक यांसारख्या महत्त्वांच्या सेवा सुरळीत राहण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहण्यास त्यांनी सांगितले.
राज्यातील अन्य भागातही पाणीपुरवठा व्यवस्था, वाहतूक तसेच आरोग्य सेवांवर कुठलाही परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बारावीची परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांना रेल्वेस्थानकावरून परीक्षा केंद्रांवर पोहोचणे सोपे व्हावे म्हणून बेस्ट प्रशासनाने पर्यायी व्यवस्था द्यावी, अशी सूचना बांठिया यांनी दिली.