आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू पिऊन गाडी चालवण्याची मुभा का? हायकोर्टाचा सरकारला सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कमी प्रमाणात दारू पिऊन वाहन चालवण्यासही परवानगी का असावी? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाला केला आहे.

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून होणाऱ्या अपघातांबद्दल कोर्टाने चिंता व्यक्त करत या प्रकरणी कायदा तोडणाऱ्यांची अजिबात गय करू नका, असे राज्य तसेच केंद्र सरकारला बजावले. अशा प्रकरणात तांत्रिकतेचे अवडंबर माजवता दोषी ठरणाऱ्यांचा वाहन चालक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत विचार करण्याबाबत न्यायमूर्ती अभय ओक आणि गौतम पटेल यांच्या न्यायपीठाने सुचविले आहे. एखाद्या व्यक्तीने दारू प्यायली असल्याचे सकृतदर्शनी दिसत असेल तर त्याने किती दारू प्यायली हे नियमानुसार ठरवण्याची गरजच काय, असा सवाल या वेळी न्यायालयाने केला.
आपल्याकडील रस्ते अधिक सुरक्षित कसे होतील हे पाहण्याऐवजी आपण विनाकारण पोलिसांवर पुरावे गोळा करण्याचे अोझे का लादतो आहोत असे मतही न्यायालयाने या वेळी व्यक्त केले. सलमान खानप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सध्या उच्च न्यायालय त्या विषयीच्या नियमांचा उहापोह करत आहे.

सध्या 30 मिलीची सूट
सध्यादारू पिऊन गाडी चालवण्याबाबत असलेल्या कायद्यानुसार रक्तातील मद्याचे प्रमाण ३० मिलीपर्यंत असल्यास तो गुन्हा ठरत नाही. मात्र त्यापेक्षा जास्त प्रमाण असल्यास चालकाला नाममात्र दंड शिक्षेची तरतूद आहे. यावर न्यायमूर्ती अभय ओक गौतम पटेल यांच्यासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...