आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Adv. Prakash Ambedkar Going To Human Rights Commission

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘भारिप’ मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोणतेही पूर्वसूचना न देता पीपल्स एज्युकेशन सोसायटीसमोर कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीहल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विरोधात ‘भारिप’ मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणार असल्याची माहिती ‘भारिप’चे कायदे सल्लागार अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.
अ‍ॅड. सदावर्ते म्हणाले की, ‘लाठीहल्ला करण्यापूर्वी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहेत. त्या सूचनांचे शुक्रवारी ‘पीपल्स’मधील लाठीहल्लाप्रकरणी पोलिसांनी पूर्णपणे उल्लंघन केले आहे. त्याविरोधात आझाद मैदान पोलिस स्टेशच्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या विरोधात मुबईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अपील करण्यात येणार आहे. तसेच हे प्रकरण मानवी हक्क आयोगासमोरही ठेवण्याचा निर्णय ‘भारिप’ने घेतला आहे.’ पीपल्स एज्युकेशन सोसायटीवरील अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची निवड कायदेशीर असल्याचा निकाल धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. त्या निर्णयाच्या प्रती घेऊन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे कार्यकर्ते शुक्रवारी (1 जून) रोजी सोसायटीच्या कारभाराचा ताबा घेण्यासाठी गेले होते; परंतु सध्या सोसायटीवर ताबा असणारे डॉ. डी. जे. गांगुर्डे आणि माजी मंत्री अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर यांनी कार्यालयाचे दरवाजे बंद केले. त्यामुळे दरवाजावर चढून कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करणा-या ‘भारिप’च्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला होता. लाठी हल्ल्यात 50 कार्यकर्ते जखमी झाले असून 8 कार्यकर्त्यांना फ्रॅक्चर आणि डोक्यास मोठा मार लागला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या 60 कार्यकर्त्यांना अटक करून वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. या घटनेनंतर कार्यकर्त्यात संताप आहे.
प्रकाश आंबेडकर यांना \'पीईएस\' प्रवेशास मज्जाव