आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅड. आंबेडकरांना निमंत्रण दिल्याने कुलगुरूपद गमावले; मध्य प्रदेश सरकारची आकसाने कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, भारतीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष व माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांना विद्यापीठात चर्चासत्राचे आमंत्रण दिल्यामुळे एका दलित कुलगुरूंना आपले पद गमवावे लागले. धक्कादायक म्हणजे ज्या विद्यापीठातील कुलगुरूंवर कारवाई झाली ते विद्यापीठ बाबासाहेबांच्या जन्मगावी आणि त्यांच्याच नावाने स्थापन झालेले आहे.   

मध्य प्रदेशातील महू (इंदूर) येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. आर. एस. कुरील यांना अपमानित करून हटवण्यात आले. कारण डाॅ. कुरील यांनी एका चर्चासत्रात अॅड. प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित केले होते. त्या चर्चासत्राला मोहन प्रकाश हे काँग्रेसचे नेतेही होते. मोहन प्रकाश यांनी मध्य प्रदेेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर चर्चासत्रात टीकाही केली होती.   या प्रकरणानंतर चौहान सरकारने कलम ४४ अन्वये डाॅ. कुरील यांना हटवले. डाॅ. कुरील हे कृषी शास्त्रज्ञ अाहेत. पदावरून हटवल्याने ते परत केंद्रात कृषी मंत्रालयात रुजू झाले आहेत.    

अॅड. प्रकाश आंबेडकरांना चर्चासत्राचे निमंत्रण  होते. त्याच िदवशी महूमध्ये शेतकरी रॅली होती. त्यात मोहन प्रकाशसोबत आंबेडकरही होते. रॅलीनंतर दोघे नेते चर्चासत्रास आले. दोघांनी चर्चेत भाग घेतला. चर्चासत्र संपल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात निदर्शने केली होती, अशी माहिती चर्चासत्राच्या आयोजक प्राध्यापकाने दिली. महत्त्वाच्या पदावर असलेल्या दलित व्यक्तींना आरएसएस, भाजप आणि उजव्या संघटनांकडून टार्गेट केले जात आहे. डाॅ. कुरील यांच्यावरील कारवाई त्याचाच  प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. माझी एक वर्ष कारकीर्द बाकी होती, हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे मला बोलायचे नाही, असे डाॅ. कुरील यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.   

डॉ. कुरील राष्ट्रपतीच्या गावचे  
डाॅ. कुरील हे उत्तर प्रदेशचे आहेत. राष्ट्रपती कोविंद यांचे ते गाववाले आहेत. कुरील यांनी गेली चार वर्षे ज्वलंत विषय चर्चेत ठेवले होते. विविध विद्यापीठांतील बुद्धिवंत महूच्या विद्यापीठात चर्चेला येत. विद्यार्थ्यांना ते बंडखोर करत हाेते, हे सारे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना अडचणीचे हाेते. डाॅ. कुरील यांना हटवण्यासंदर्भात चौहान यांच्यावर दबाव होता. त्याला या चर्चासत्राचे केवळ निमित्त िमळाले, अशी पार्श्वभूमी विद्यापीठातील एका प्राध्यापकाने सांगितली.   
बातम्या आणखी आहेत...