आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात अॅडव्हान्स वॉरशिप मोरमुगाओ लाँच, शेकडो किलोमीटरवरुन ओळखणार शत्रूला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय नौदलाने आपले सर्वात अॅडव्हान्स डिस्ट्रॉयर वॉरशिप मोरमुगाओ शनिवारी लाँच केले. यात ब्रम्होस सुपरसॉनिक मिसाइल असणार आहेत. मोरमुगाओ नौदलाचे प्रोजेक्ट 15बी नुसार तयार केले गेले आहे. या श्रेणीतील वॉरशिप सहजासहजी शत्रूंच्या रडारवर येत नाहीत. त्यासोबतच मोरमुगाओ 70 किलोमीटर अंतरावरुनही शत्रूंचे विमान आणि क्षेपणास्त्राचा छडा लावण्यात तरबेज आहे.

- जहाजाचे वैशिष्ट्य हे आहे की यात इस्त्रायल तंत्रज्ञानाने बनलेले मल्टी फंग्शन सर्व्हिलन्स थ्रेट अलर्ट रडार (MF-STAR)यंत्रणा आहे. यामुळे हवेत शेकडो किलोमीटर अंतरावरील शत्रूंचे विमान आणि क्षेपणास्त्रांचा पत्ता लागू शकतो.
- मोरमुगाओ इंडियन नेव्हीच्या प्रोजेक्ट 15-बी अंतर्गत तयार झालेले दुसरे वॉरशिप आहे. या श्रेणीतील पहिले जहाज गेल्यावर्षी एप्रिलमध्ये लाँच झाले होते.
- 4 वॉरशिप तयार करण्यासाठी 29,700 कोटी रुपये खर्चून हा प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे.
- मोरमुगाओचे वजन 7300 टन आहे. त्याची लांबी 163 मीटर आहे.
- या वॉरशिपला चार यूक्रेनियन गॅग टर्बाइन इंजिन आहे. यामुळे जहाज 30 नॉट (जवळपास 56 KMPH) वेगाने चालते.
बातम्या आणखी आहेत...