आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवीला जामीन दिल्यास ती पुन्हा निष्पापांना चिरडेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मद्यधुंद अवस्थेत, राँगसाइड भरधाव अाॅडी चालवून दाेन जणांचा बळी घेणारी काॅर्पाेरेट वकील जान्हवी गडकर हिच्या जामीन अर्जास मुंबई पाेलिसांनी साेमवारी सत्र न्यायालयातील सुनावणीच्या वेळी विराेध केला. ‘जान्हवी जामिनावर बाहेर अाल्यास ती पुन्हा त्याच पद्धतीने निष्पापांना चिरडेल,’ अशी भीती तपास अधिकाऱ्याने व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाची अाता बुधवारी सुनावणी हाेईल.

८ जूनच्या मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत भरधाव अाॅडी कार चालवून ३५ वर्षीय जान्हवीने टॅक्सीला धडक दिली हाेती. त्यात चालकासह दाेघांचा मृत्यू झाला तर दाेघे जखमी झाले हाेते. याप्रकरणी जान्हवीला अाधी पाेलिस काेठडी व नंतर न्यायालयीन काेठडी सुनावण्यात अाली. जान्हवीने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्यावर साेमवारी सुनावणी झाली. ‘जान्हवीविराेधात भक्कम पुरावे अाहेत. तिला अाता जामिनावर बाहेर साेडल्यास ती पुन्हा असेच भयंकर कृत्य करेल,’ अशी भीती पाेलिस अधिकाऱ्याने व्यक्त केली. ‘टॅक्सीतील दाेघांच्या मृत्यूस जान्हवी हीच जबाबदार अाहे. तिला जामीन मंजूर केल्यास ती पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करू शकेल. त्यामुळे तिचा अर्ज फेटाळून लावावा,’ अशी विनंतीही न्यायालयास करण्यात अाली.
.. तर जान्हवीला कायमचे व्यंग येईल
जान्हवीचे वकील महेश सबनीस यांनी न्यायालयास सांगितले की, ‘८ जूनच्या अपघातात जान्हवीलाही दुखापत झाली अाहे. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर ती कायमस्वरूपी व्यंग येण्याची भीती अाहे. त्यामुळे उपचारासाठी तरी जामीन मिळावा.’ बचाव पक्षाच्या या युक्तीवादानंतर न्यायाधीश रिचा खेडकर यांनी जान्हवीचे वैद्यकीय अहवाल मागवून घेतले अाहेत.