मुंबई - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला देहविक्री करायला लावण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून नवी मुंबई पोलिसांनी एका वकिलासह चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की वकील संजय भोईर, त्याची पत्नी रूबी,
सलमान खान व किशोर ठाकूर या चौघांना एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. २०१३ मध्ये सहा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला देहविक्री करायला लावण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये आणखी एका मुलीचे अपहरण झाले होते. या मुली वकिलाच्या घरी आढळून आल्या होत्या.