आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या भारतीय महिलेला काबूलमध्ये धमकी नव्हे, तर लग्नाचे प्रस्ताव येतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत वाढलेली कविता नायर कोलंबिया विद्यापीठात पब्लिक अफेअर्स विषयात पदवीधर झाली आहे. 2009 मध्ये करिअरला सुरुवात करण्याची वेळ आली, तेव्हा तिने जगातील सर्वात धोकादायक अफगाणिस्तान देशाची निवड केली. महिलांनी काम करण्यास तालिबानचा विरोध असतानादेखील ती मोठ्या धैर्याने आणि धाडसाने काबूल येथील शमशाद रेडिओ व टेलिव्हिजन नेटवर्कमध्ये संचालकपदी (व्यवसाय विकास) रुजू झाली. अफगाणिस्तानमधील कामाच्या अनुभवात तिला अतिरेक्यांच्या धमकीचे कॉल आले नाहीत, त्याऐवजी लग्नाचे प्रस्ताव मात्र आले असल्याचे कविताने सांगितले.

सिंगल मॉम : 37 वर्षीय कविताला अफगाणिस्तानमध्ये येण्याआधी मुलगा मिखाइलला आपल्या आईकडे मुंबईत सोडणे भाग पडले होते. त्या वेळी आईने तिला म्हटले होते, या आत्मघाती रस्त्यावर तुला एकटीला जावे लागेल. मात्र, काही दिवसांनंतर कविताने मिखाइलला बरोबर घेतले आणि आता ती मिखाइलसोबत काबूलमध्ये राहत आहे.

प्रेरणा : सात भाषा बोलणारी कविता दहशतवादाच्या संकटात सापडलेल्या अफगाणिस्तानमध्ये येऊ इच्छित नव्हती. एका पुस्तकातून तिचे मन वळले आणि अफगाणिस्तानमध्ये येण्याचा निर्णय घेतला. येथे आल्यापासून ती येथेच वास्तव्यास आहे.

छायाचित्र - कार्यालयात आपल्या कविता नायर.
पुढील स्लाइडवर पाहा, कविता यांच्या आयुष्यातील काही खासगी छायाचित्र...