आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 20 Months Cm Once Again Working On 6th Floor

PHOTO: 20 महिन्यांनतर मुख्यमंत्री 6 व्या मजल्यावर, आलिशान केबिनमध्ये कामकाज सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यालय 20 महिन्यानंतर पुन्हा सहाव्या मजल्यावर सुरु झाले. 21 जून 2012 रोजी मंत्रालय आगीच्या भस्मस्थानी पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सहाव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर आणले होते. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सहाव्या मजल्यावर सुरु झाले. मुख्यमंत्र्यांचे नवे कार्यालय एकदम अलिशान असल्याचे दिसून येत आहे.
मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय पहिल्या मजल्यावर हलवण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय कायमस्वरूपी पहिल्याच मजल्यावर राहावे अशी इच्छा पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना सहाव्या मजल्यावरच कार्यालय असणे योग्य ठरेल, असे सांगितले होते.
मंत्रालयाला लागलेल्या आगीत राखरांगोळी झालेल्या सहाव्या मजल्याच्या नूतनीकरणाचे काम दिवसरात्र एक करून करण्यात आले. नूतनीकरणात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि सहायक मुख्य सचिवांचे कार्यालय तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सोडून इतरांनी मंत्री व अधिका-यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या नव्या दालनात कामकाज सुरूही केले होते.
मुख्यमंत्र्यांची केबिन अत्यंत आलिशान बनवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांना आपल्या केबिनच्या खिडकीतून समुद्राकडचे विहगंम दृश्य दिसावे यासाठी खास खिडकीची सोय करण्यात आली आहे. त्याला बुलेटप्रूफ काच बसविण्यात आली आहे.
पुढे पाहा, मुख्यमंत्र्यांच्या नूतन कार्यालयाचे छायाचित्रे....