आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 24 Hours Five Notorious Gangsters Not Found Who Was The Run From Nagpur Jailbreak

नागपूर: जेलमधून पळून गेलेल्या 5 कैद्यांना शोधण्यात पोलिसांना 24 तासानंतरही अपयश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- देशात सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातून मंगळवारी पहाटे पाच कैद्यांनी पलायन केल्याची घटना घडली. मात्र, 24 तास उलटून गेल्यानंतरही नागपूर पोलिसांना या कैद्यांना पकडण्यात यश आलेले नाही. खिडकीचे गज एक्सा ब्लेडने कापून नंतर चादरींचे दोरखंड बनवून 23 फूट उंचीची भिंत पार करून या कैद्यांनी फिल्मी स्टाईलने धूम ठोकली. या घटनेस जबाबदार असणा-या तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. मात्र, मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट बनला आहे. नागपूरमधील गुंडगिरी व गुन्हेगार यांच्या कहाण्या कायम चर्चेत असतात.
भिसेन उईके (रा. धुमाल शिवनी, मध्य प्रदेश), मोहम्मद खान सलीम (रा. मानकापूर, नागपूर), सत्येंद्र गुप्ता (रा. कामटी, नागपूर), नेपाली खादी (रा. नेपाळ), आकाश ठाकूर (रा. कुतुबशहा नगर, गिटीखदान, नागपूर) अशी पलायन केलेल्या कैद्यांची नावे आहेत. या पाचपैकी तीन जणांवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. तर दोन आरोपी 392च्या प्रकरणातील आहेत. पळालेले सर्व आरोपी हे राजा गवस गँगचे सदस्य आहेत.
दरम्यान, राज्याच्या तुरुंग प्रशासन महानिरीक्षक मीरा बोरवणकर या नागपूरात दाखल झाल्य आहेत.