आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५५ वर्षांनी मराठी बनली राजभाषा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठीला राजभाषेचा दर्जा देणारी कायदेशीर तरतूद नसल्याची त्रुटी दूर करणारे विधेयक विधानसभेत बुधवारी मंजूर झाले. भाषामंत्री विनोद तावडे यांनी विधेयक सादर केले हाेते. १९६४ च्या राजभाषा विधेयकात दुरुस्ती करून देवनागरीतील मराठी ही राजभाषा असेल, अशी तरतूद त्यात केली आहे. तामिळनाडू व कर्नाटकने आधीच राजभाषा कायदा करून तमिळ, कानडीला तो दर्जा दिला आहे. त्याच धर्तीवर मराठीला राजभाषेचा दर्जा दिल्याचे सरकारने म्हटले आहे. घटनेच्या कलम ३४५ मध्ये उल्लेखित सर्व प्रयोजनांस महाराष्ट्रात मराठी वापरली जाईल असे यात म्हटले आहे.