आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी अटक करताच अशी उतरली रोहित बालची नशा; हात जोडून लागला माफी मागायला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/दिल्ली- दारुच्या नशेत शेजारच्या व्यक्तिला शिविगाळ करत मारहाण करणे फॅशन डिझायनर रोहित बाल याला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी त्याला अटक झाल्यानंतर त्याची नशा उतरली. नंतर तो पोलिसांसह संबंधित व्यक्तीच्या हात जोडून माफी मागायला लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे आहेत रोहित बालवर आरोप...
- डिझायनर रोहित बाल याला शुक्रवारी (22 सप्टेंबर) दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत अटक केले. नंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली.
- रोहितसह त्याचा ड्रायव्हर, कूक आणि मित्राला पोलिसांनी अटक केली होती.
- रोहीत मित्रांसोबत गुरुवारी (21 सप्टेंबरला) रात्री 11 वाजेच्या सुमारात घरी आला. तो नशेत तर्रर्र होता. त्याने पार्क‌िंग स्पेसवरून शेजारच्या व्यक्तिला शिविगाळ करत बेदम मारहाण केली.
- मारहाण झालेल्या व्यक्तिने पोलिसांना फोन करून सर्व हकीकत सांगितली.   
- पहाटे 3 वाजेच्या दरम्यान दिल्ली पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रोहितला ताब्यात घेतले. तो नशेत होता.

कोण आहे रोहित बाल?
- रोहित बाल हा फेमस फॅशन डिझायनर आहे. दिल्लीसह मुंबई, बंगळुरु, अहमदाबाद, कोलकाता आणि चेन्नईत त्याचे अनेक स्टोअर्स आहेत.
- कौन बनेगा करोडपतीसाठी अमिताभ बच्चन आणि बॉलिवूड सेलेब्ससाठी रोहित याने ड्रेस डिझाइन केले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... सोशल मीडियावर व्हायरल झालेले रोहित बाल याचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...