मुंबई- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा वांद्रेत पराभव झाल्यानंतरही त्यांच्या समर्थकांनी मुंबई शहरात पोस्टरबाजी करून शिवसेनेला प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. राणेंचा पराभव झाल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या जुहूतील घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी केली होती. त्यानंतर आता राणे समर्थकांनी शिवसेनेच्या अंगणात म्हणजेच मातोश्रीजवळील कलानगर भागात पोस्टर लावून प्रत्त्युत्तर दिले आहे. 'अडला' नारायण नाही, सदैव 'नडला' नारायण, 'पडला' तरी मर्दा सारखा पुन्हा 'भिडला' नारायण' असे या पोस्टरमध्ये म्हटले आहे.
आपल्याला माहित असेलच की, 8 एप्रिल रोजी खेरवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची खिल्ली उडविली होती. उद्धव ठाकरे यांनी मराठीतील एक म्हण वापरत 'अडला नारायण' नव्हे 'गाडला नारायण' अशी गत होणार असल्याची टीका केली होती. त्यानंतर लागलीच राणेंचे धाकटे सुपुत्र व आमदार नितेश राणे यांनी जे टि्वट केले होते त्याचेच आता मातोश्रीच्या अंगणात पोस्टर लावले आहेत.
पुढे वाचा, नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर काय टि्वट केले होते...