आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Bjp Now Shivsena Chief Uddhav Ordered To Party Worker Be Prepared For 288 Seats

भाजपच्या स्वबळाच्या ना-यानंतर शिवसेनेचेही आता 'एकला चलो रे'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रदेश भाजपच्या कार्यकारिणीच्या मुंबईत गुरुवारी झालेल्या बैठकीत भाजपच्या काही नेत्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेनेनेही राज्यातील सर्व आपल्या विभागप्रमुखांना 288 जागा लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज सकाळी हे आदेश दिल्याचे सूत्रांनी माहिती दिली. भाजप स्वबळावर लढत असेल तर शिवसेना स्वागतच करेल असे उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभर मिळालेल्या यशानंतर राज्यातील प्रदेश नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. राष्ट्र जिंकले आपणच.. आता महाराष्ट्रही जिंकू आपणच.. हे घोषवाक्य घेऊन भाजपने आगामी विधानसभेची जोरदार तयारी चालवली आहे. गुरुवारी पक्षाच्या अंधेरी येथे पार पडलेल्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात अनेक नेत्यांनी शिवसेनेबरोबर फरपटत जाण्यापेक्षा स्वबळावर ताकद आजमावण्याची भाषा केली. यात ज्येष्ठ नेते मधु चव्हाण यांनी तर भाजपसोबत तीन पायांची शर्यत थांबवण्याची सूचना केली आणि त्यांना सूरजसिंग ठाकूर, एकनाथ पवार व वर्षा भोसले या इतर तीन नेत्यांनी पाठबळ दिले. वर्षोनुवर्षे त्यांच्यामागे फरफटत जाण्यापेक्षा स्वबळावर गेल्यास पक्षाची ताकद तरी समजेल. आणखी किती वर्षे शिवसेनेच्या वृक्षाखाली बोनसाय होऊन राहायचे?’ हाच सूर वरच्या टिपेला नेताना आणखी तीन पदाधिकार्‍यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी केली.

दरम्यान, भाजप निम्म्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबावाचे राजकारण करीत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. देशात यश मिळाले म्हणून राज्यात यश मिळेल अशी कोणतीही खात्री देता येत नसते. प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या पातळीवर व मुद्यांवर होत असते. मात्र, भाजपने 24 पैकी 23 जागा जिंकल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच पदाधिकार्‍यांच्या तोंडून युती तोडण्याची भाषा करायची आणि वर सबुरीचा सल्ला द्यायचा, ही भाजप नेत्यांची भाषा म्हणजे 288 पैकी निम्म्या 144 जागा पदरात पाडून घेण्याचे डावपेच असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाच वर्षांपूर्वी शिवसेना ज्या ठिकाणी तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर राहिली, अशा किमान 35 ते 40 जागा भाजपला पदरात पाडून घ्यायच्या भाजपचा डाव आहे.
(छायाचित्र- उद्धव ठाकरे)
पुढे आणखी, महायुतीतील घडामोडीबाबत व शिवसेनेच्या भूमिकेविषयी...