आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After Dolly Bindra, Model Arshi Khan Accuses Radhe Maa Of Running Sex Racket

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राधे माँ सेक्स रॅकेट चालवायची; अर्शी खानचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधेमाँ ही सेक्स रॅकेट चालवत होती, असा आरोप मॉडेल आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अर्शी खान हिने केला आहे. राधेमाँने मला सेक्स रॅकेटमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत अर्शीने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच आपल्याला आता फोनवरून धमक्या दिल्या जात असल्याचे तिने म्हटले आहे.

राधेमाँची आणि आपली सात महिन्यांपूर्वी भेट झाली होती. त्या वेळी राधेमाँच्या एका सहकार्‍याने तुला पैसा आणि प्रसिद्ध हवी असल्यास आमच्या सेक्स रॅकेटच्या धंद्यात सहभागी व्हावे लागेल, अशी ऑफर दिली होती. तसेच राधेमाँने इतर मुलींनाही सेक्स रॅकेटमध्ये गुंतवले असल्याचा दावाही अर्शीने केला आहे. अर्शी ही मॉडेल असून तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसोबत तिचे अफेअर सुरू असल्याची चर्चा आहे. अर्शी ही मूळ अफगाणिस्तानमधील असली तरी भारतात राहते.