आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Editors Gild Talk On Shinde\'s Statement, He Give Clerification

मीडियाला ठेचून काढू या वक्तव्यावरून गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे घूमजाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मीडियाने सत्य तेच दाखवावे. सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून विशिष्ट पद्धतीने अपप्रचार सुरू आहे. हे योग्य नाही. भविष्यात असा प्रकार झाला, तर इलेक्ट्रॉनिक मीडियाला आम्ही ठेचून काढू,’ अशी दमबाजीची भाषा करणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 12 तासांच्या आतच घूमजाव केले आहे. मी पत्रकारितेबाबत बोलत नव्हतो तर सोशल नेटवर्किंग मिडियाबाबत बोलत होतो, अशी सारवासारव केली आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्या या वक्तव्याचा संपादकांच्या संघटनेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला होता. राजकारण्यांनी निराधार आरोप लावू नयेत. याबाबत पुरावे असतील तर याबाबत सरकारने पुढचे पाऊल टाकावे असे 'एडिटर्स गिल्ड'ने म्हटले होते. त्यानंतर परिस्थिती चिघळण्याची शक्यता दिसताच शिंदेंनी घूमजाव केल्याचे दिसत आहे.
सोलापूर लोकसभा युवक कॉँग्रेसच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या एका मेळाव्यात ते बोलले होते. शिंदेंनी इलेक्ट्रानिक माध्यमांवर आगपाखड करताना म्हटले होते की, अपप्रचार करून इलेक्ट्रॉनिक मीडिया नागरिकांची दिशाभूल करत आहे. यातून विनाकारण बदनामीही होत आहे. अशा अपप्रचाराला जनता कधीच माफ करणार नाही. यावर नियंत्रण कसे ठेवायचे हे आता आम्हाला समजले आहे. इथून पुढे असे प्रकार झाले, तर त्याची अंतर्गतरीत्या तपासणी करून त्यांना ठेचून काढू, असे शब्दांत गृहमंत्र्यांनी माध्यमांनाच दमबाजी केली होती.