आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोटांचे ठसे, आधार क्रमांक मिळाल्यावरच शाळांना अनुदान, राज्य सरकारनचे पाउल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाळांमधील बोगस प्रवेशाला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यानुसार आता आदिवासी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड नंबर आणि बोटांचे ठसे याची माहिती दिल्यावरच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदान मिळणार आहे. यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून त्याचे अनावरण लवकरच करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या आदिवासी विभागाने राज्यातल्या नामांकित शाळांना प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाअंतर्गत अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आदिवासी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले. हा निर्णय सर्व शाळांसाठी नसून नामांकित शाळांसाठी अाहे. यासंदर्भात एक विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक, बोटांचे ठसे, छायाचित्र, मागील वर्षातल्या इयत्तेचा निकाल आदी माहिती शाळांना अद्ययावत ठेवावी लागेल. आदिवासी विभागाकडून लवकरच नामांकित शाळांची श्रेणी ठरवण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...