आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Made Directors Of Reliance Jio Mukesh Ambani’s Twin Kids Aakash & Isha Finally Launched Corporate Level

अंबानींच्या \'जिओ\'ला मिळाले नवे चेहरे, मुले आकाश व ईशा झाले सक्रिय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकेश अंबानींची 23 वर्षीय जुळी मुले आकाश व ईशा अंबानी... - Divya Marathi
मुकेश अंबानींची 23 वर्षीय जुळी मुले आकाश व ईशा अंबानी...
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जुलै रोजी देशाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा दावा करत डिजिटल इंडिया सप्ताह आणि सर्व डिजिटल उत्पादने सादर केली. मात्र, याच वेळी देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मुलगा आकाश आणि मुलगी ईशा यांचेदेखील कॉर्पेरेट लाँचिंग केले.
पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर डिजिटल इंडियामध्ये व्यावसायिकांची भूमिका सांगणाऱ्यांमध्ये प्रथम स्थानी मुकेश अंबानी होते. त्याच वेळी त्यांचा मुलगा आकाश आणि मुलगी ईशा आई नीता अंबानींजवळ इतर व्यावसायिकांसोबत बसलेले होते. विशेष म्हणजे जिओ इंडियाच्या संचालकपदावर असलेल्या या दोघांनीही डिजिटल इंडियामध्ये जिओचा सहभाग याविषयी पत्रकारांशी बराच वेळ चर्चा केली. दोघांच्या सोबत मीडियाने केलेली ही पहिलीच व्यावसायिक चर्चा आहे. रिलायन्स जिओ डिजिटल इंडियामध्ये कशी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहे, याची दोघांनीही माहिती दिली.

अभियान लक्षवेधी- आकाश अंबानी

मोदी यांचे डिजिटल इंडिया अभियान लक्षवेधी असल्याचे मत आकाश अंबानी यांनी व्यक्त केले. यात त्यांनी रिलायन्स जिओ महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी ज्या पद्धतीने पत्रकारांशी चर्चा केली त्यावरून हे स्पष्ट होते की, अंबानींनी त्यांना पुढे करण्याची पूर्ण तयारी केली आहे.
जिओ इन्फोकॉम स्टार्टअप- ईशा अंबानी
कार्यक्रमादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीदेखील सक्रिय होत्या. त्यांनी पत्रकारांशी चर्चा करताना डिजिटल इंडिया अभियान एक चांगले पाऊल असल्याचे सांगत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वडील मुकेश अंबानी यांचे भाषण ऐकण्यासाठी आल्याचे सांगितले होते.
देशात 4- जी सेवा डिसेंबरपासून-
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमकडे पूर्ण देशभरात टेलिकॉम सेवा देण्यासाठी युनिफाईड परवाना आहे. कंपनी लवकरच 4-जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ही दूरसंचार सेवा व्यावसायिक स्तरावर सुरू करण्याबरोबरच कंपनी चार हजार रुपयांत 4-जी स्मार्टफोन कंपनी देणार आहे. त्याचे मासिक बिल 300 ते 500 रुपये असेल. कंपनी आगामी 12 ते 18 महिन्यांत 2 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक रूपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स जिओ ही 2015 अखेर 29 राज्‍यांत 4 जी सेवा सुरु करेल. व्हॉईस आणि डेटाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्या दृष्टीने 4-जी सक्षम स्मार्टफोन डिसेंबरपर्यंत बाजारात येईल आणि त्याची किंमत हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. आपल्या दूरसंचार सेवेअंतर्गत ग्राहकांना बातम्या आणि मनोरंजन सेवा पुरवण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन बाजारात आणणार आहे. शिवाय 8 प्रादेशिक भाषांत वेगवेगळे 14 चॅनेल सुरु करणार आहे.
मासिक 300 ते 500 रुपये खर्च-

10 ते 15 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या सुधारणांच्या पावलावर पाऊल टाकत शहरे तसेच ग्रामीण भागातील प्रत्येकाला पॉवर ऑफ कॉम्प्युटिंग, कम्युनिकेशन आणि इन्फर्मेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात येण्याची योजना आहे. ही सर्व सुविधा मासिक 300 ते 500 रुपये खर्चात मिळेल.
पुढे वाचा, रिलायन्सचे Jio चॅट लावणार Whatsapp ची 'वाट', 4Gत मिळणार अनोख्या सुविधा...