आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई: 4000 अभियंते संपावर, खड्डे मुद्द्यावरून 1300 अभियंत्यांचे राजीनामे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटनेत्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यावरून पालिकेच्या मुख्य अभियंत्याला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात पालिकेतील अभियंत्यांनी गुरुवारी आंदोलनाचे हत्यार उपसले. पालिकेच्या हजार २०० अभियंत्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून १ हजार १३० अभियंत्यांनी पालिका प्रशासनाकडे सामूहिक राजीनामे सुपूर्द केले आहेत.

रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याची मुदत संपल्यावरही खड्डे कायम होते. त्यामुळे मनसेने अभियंत्यांना धडा शिकवायचा िनर्णय घेतला. दादर येथे रस्ते विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे यांना बोलावून घेण्यात आले. सर्वासमक्ष रस्त्यावरील खड्डे मोजण्यास भाग पाडले. त्यांच्या हातात ‘मी खड्ड्यांना जबाबदार आहे’ असा फलक देऊन रस्त्यावर उभे केले. मनसेच्या या आंदोलनानंतर पालिकेच्या अभियंत्यांमध्ये संतापाची लाट उसळली. शुक्रवारी वरळी हब येथील कार्यालयासमोर सर्व अभियंते एकत्रित आले. त्यांनी मनसेिवरोधात जोरदार आंदोलन छेडले. राजकीय स्वार्थासाठी अधिकाऱ्यांचा छळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही या अभियंत्यांनी या वेळी िदला. दुपारी अभियंत्यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. जोपर्यंत मनसे नगरसेवक संदिप देशपांडे संतोष धुरी यांना अटक केली जात नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा निर्णय अभियंता संघटनेने घेतला आहे. याप्रकरणी कायदेशीर बाबी तपासून कारवाई केली जाईल, असे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

मनसेची अायुक्तांना धमकी : महापालिकाप्रशासनास मुंबईतील खड्डे बुजवण्याबाबत मनसेने १० दिवसाचा कालावधी दिला आहे. त्या अवधीत खड्डे बुजवल्यास खुद्द आयुक्तांनाच खड्ड्यात उभे करण्यात येईल, अशी स्पष्ट धमकी मनसेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे, त्यामुळे आम्हाला घरी बसवण्याचा निर्णय मतदारच घेऊ शकतात, मुख्यमंत्र्यांच्या मर्जीने आलेले आयुक्त नाही. आमच्या राजीनाम्यामुळे जर मुंबईमधील खड्डे बुजवणार असतील तर लगेच राजीनामेही देऊ, असेही मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

महापालिकेतील सर्वच्या सर्व ४२०० अभियंत्ये सामूहीक रजेवर गेल्यास मुंबईतील पाणीपुरवठा, कचरा उचलणे आदी सेवा ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळे या अभियंत्यांचा राग शांत करण्यासाठी मनसेच्या दोघा नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...