आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Munde\'s Death State Bjp Meeting Is Going At Mumbai

लोकनेते गोपीनाथ मुंडे ही व्यक्ती नव्हे तर संस्था - देवेंद्र फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मित निधनाने भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. मुंडे हे केवळ लोकनेते, व्यक्ती नव्हती तर ती एक संस्था होती. मुंडेंनी पक्षावर कोणताही निर्णय लादला नाही. प्रत्येक निर्णय कोणत्या परिस्थितीत व का घेतला याची ते आम्हाला माहिती देत असत. त्यांची उणीव भरून काढणे आम्हाला केवळ अशक्य आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मी पक्षाकडे कधीही काहीही मागणार नाही जे काही मिळवेन ते संघर्ष करूनच घेईन असे आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी म्हटले आहे. मुंडेसाहेबांची ऊंची गाठणे आम्हाला कोणालाही जमणार नाही असेही पंकजाने म्हटले आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक दादरच्या वसंत स्मृती भवनात कालपासून आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत फडणवीस म्हणाले, महायुतीची सत्ता आणणे हीच मुंडेंना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत मुंडे पक्षाचे नेतृत्व करतील, याचा आपल्याला आधार होता. पण त्यांच्या अचानक जाण्याचे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढायचे झाल्यास नेत्यांना, कार्यकर्त्यांना आक्रमक व विजयाच्या मानसिकतेने निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. मुंडे नसताना राज्याची सत्ता काबीज करणे भाजपसमोर मोठे आव्हान असेल अशी कबूली देत फडणवीस म्हणाले, मुंडेंच्या पश्चात आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. यामुळे आता आपल्या सर्वांना खूप मेहनत घेऊन भाजपला राज्यातील एक क्रमांकाचा पक्ष करावा लागेल.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे. नाकर्त्या सरकारविरोधात जनतेचा कौल मागायला जाताना नाराज जनतेच्या मनातील अंगार फुलवण्याचे काम करावे लागणार आहे. एकच लक्ष्य मंत्रालयावर महायुतीचा झेंडा, हे आव्हान समोर ठेवून पुढील तीन महिन्यांत सर्वांनी मेहनत घ्यायला हवी, असे फडणवीस म्हणाले.
प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला भाजपचे खासदार, आमदार यांच्यासह एकनाथ खडसे, विनोद तावडे, पांडुरंग फुंडकर, महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रूडी, पंकजा मुंडे आदींसह राज्यातील सर्व पदाधिकारी व निमंत्रित उपस्थित आहेत.
(छायाचित्र: देवेंद्र फडणवीस)