आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After Ncp Now Mns Joins Aginest The Show Aib Knockout

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AIB नॉकआऊट शोला मनसे-राष्ट्रवादीचा विरोध, दिला आंदोनलाचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऑल इंडिया बक... ( एआयबी) नॉकआऊट हा शो अश्लिल वक्तव्यामुळे वादात आला आहे. या शोच्या विरोधात राष्ट्रवादीनंतर आता मनसेने उडी घेतली आहे. एआयबी हा शो महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या विरोधात आहे त्यामुळे हा बंद करावा. तसेच ज्या कलाकारांनी यात भाग घेतला आहे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा या कलाकारांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशा इशारा मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी दिला आहे. तर, एआयबी हा शो तत्काळ बंद करावा अन्यथा त्याविरोधात आंदोलन करू अशा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दिला आहे. दरम्यान, या शोच्या विरोधात आता सर्वच स्तरातून राळ उडत चालली आहे.
दरम्यान, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या शोच्या प्रसारणासाठी संबंधितांनी सेन्सारची परवानगी घेतली आहे का नाही हे तपासून चौकशी केली जाईल. त्यानंतर योग्य ती भूमिका घेऊ. संबंधितांनी असे प्रमाणपत्र घेतले नसेल तर कार्यक्रमाच्या निर्मात्यावर व प्रकाशकावर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे. मात्र, या शो ची परवानगी घेतली असेल तर हा शो बंद करता येणार नाही. अशी भूमिका सरकारने घेतली तर सरकारवरच टीका होईल व अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी सुरु केल्याची ओरड होईल अशी भीतीही तावडेंनी व्यक्त केली आहे.