आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Outrage, Abu Azmi Clarifies His Controversial Comments News In Divya Marathi

बलात्कार्‍यांना चाबकाचे फटके द्या;वादग्रस्त विधानावरून आझमींचे घूमजाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बलात्कार प्रकरणातील महिलेलाही फाशी द्यावी, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी आपल्या विधानावरून घूमजाव करत आपण असे काहीही म्हणालोच नाही, असा सूर लावला. माध्यम व महिला आयोगाकडून टिकेची झोड उठल्यानंतर आझमी यांनी याबाबत रविवारी पत्रकार परिषद घेऊन तातडीने खुलासा केला.

आझमी म्हणाले, बलात्कार करणार्‍या व्यक्तींना 100 चाबकाचे फटके मारले पाहिजेत किंवा त्यापेक्षाही कठोर शिक्षा करावी. फाशीच्या कायद्यात आणखी सुधारणा करणे गरजेचे आहे. विवाहापूर्वी किंवा नंतर अनैतिक संबंध ठेवणार्‍या घटनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी बलात्कार प्रकरणात महिलेलाही फाशी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, सून आयेशा टाकिया व सर्व स्तरातून त्यांचा निषेध होऊ लागल्यानंतर त्यांनी आपण असे काही म्हणालो नव्हतो, असा खुलासा केला. शनिवारी राज्य महिला आयोगाने आझमी यांना नोटीस बजावली होती.