आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच पावसात मुंबईची कशी झाली तुंबापुरी, पाहा PHOTOS...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या 36 तासापासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी सकाळी मात्र पावसाने थोडी उसंत घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे तुंबलेले पाणी समुद्रात जाण्यास वेळ मिळाला आहे. मुंबईतील जनजीवन सामान्य होऊ लागले आहे. शुक्रवारी मुंबई शहरासह उपनगरात सर्वत्र जिकडे तिकडे पाणीच पाणी साठले होते. मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळित झाल्याने पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास डिजास्टर कंट्रोल रूममध्ये पोहचले होते. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाऊस व परिस्थितीचा आढावा घेतला होता. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात 500 पेक्षा जास्त मिलीमिटर पावसाची नोंद झाली.
मुंबईतील मध्य, हॉर्बर व पश्चिम या तीनही मार्गावरील रेल्वेसेवा सकाळी साडेसहा वाजल्यापासून ठप्प झाली होती. तर मेट्रो सेवाही कोलमडली आहे. रस्त्यावर व सखल जागेत पाणीच पाणी साठल्याने प्रवास करणा-यांना त्रास होत आहे. दुपारी एक वाजता पश्चिम रेल्वे मार्गावर विरार ते अंधेरी या लांबपल्ल्याची गाडी सुरु करण्यात आली आहे. पाणी हळू हळू कमी होत आहे त्यामुळे लवकरच लोकलसेवा पूर्ववत सुरु करू असे रेल्वेच्या जनसंपर्क अधिका-यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुढील 24 तास मुंबईत जोरदार पाऊस बरसेल असे हवामान खात्याने म्हटले आहे. आज दुपारी अरबी समुद्रात हायटाईडच्या लाटा उसळणार आहेत. मुंबईकरांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, शाळा-कॉलेज बंद ठेवावेत असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. रेल्वे व मेट्रो सेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांची मात्र त्रेधातिरपिट उडाली आहे. मुंबईतील सर्वच मार्गावर पाणी साठल्याने वाहने सावकाश पुढे सरकत असून, मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दादर, कुर्ला, हिंदमाता, अंधेरी, मालाड, चकाला, बोरीवली, सांताक्रूज या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्यामुळं अनेक गाड्या बंद पडल्या आहेत. पावसाचा हवाई वाहतुकीवरही परिणाम होताना दिसत आहे. अनेकांना विमान उड्डाणाच्या वेळी पोहचता न आल्याने ती चुकल्याचे समोर येत आहे. अभिनेता फरहान अख्तरने मुंबईत साठलेल्या पाण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी बीएमसी करोडो रूपये खर्च करतेही तरीही मुंबईकरांना पावसाचा त्रास सहन करावा लागतो. आता खरोखरंच काही निश्चित असे नियोजन करण्याची वेळ आली आहे असे फरहानने म्हटले आहे.
पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस-
कोकणासह मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सह्याद्रीच्या रांगेतही पावसाने जोरदार मोहिम उघडली आहे. पुण्यातही पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात हायटाईडलच्या लाटा उसळणार आहेत. मुंबईत पुढील 24 तास जोरदार पाऊस होईल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातही पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासन व यत्रंणा सतर्क, लागले कामाला
- मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे, साचलेले पाणी उपसण्यासाठी बीएमसीने 250 पेक्षा जास्त पंपाद्वारे काम सुरू आहे.
- मुंबईतील मुसळधार पाऊस लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने आज व उद्या होणारे पेपर्स पुढे ढकलले आहेत.
- मुंबईतल्या सगळ्या शाळांना आज सुट्टी द्यावी असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्ता अजेय मेहता यांनी दिले आहेत.
- पाण्याची पातळी खाली जाईपर्यंत रेल्वे सेवा सुरु करता येणार नाही - मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील
- मुसळधार पावसामुळे मुंबईतील मेट्रो सेवाही विस्कळीत, मेट्रो 10 मिनीटे उशीरा धावत आहेत.
- मुंबईतील जनजीवन विस्कळित झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा जळगावचा दौरा रद्द, जळगावला उद्या जाणार
- मुसळधार पावसामुळे मुंबई हायकोर्टातील कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित.
- अपघात/ धोका टाळण्यासाठी मुंबईतील गीतानगर पंपिंग, आदर्श, साधू वासवानी मार्ग, कफ परेड ट्रंझिट या काही भागातील उपकेंद्रे बंद करून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तुंबलेले पाणी कमी होताच खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल असे अधिका-यांनी सांगितले.
- विक्रोळीतील पार्कसाईट पोलिस ठाण्यात पाणी भरल्याने पोलिस ठाण्याचा वीज पुरवठा खंडीत.
- आज दुपारी 2 वाजून 29 मिनीटांनी मुंबई व कोकण किनारपट्टीवर हायटाईडचा इशारा. मुंबईत 4. 47 मीटरच्या लाटा उसळणार, समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला
पुढे पाहा, मुसळधार पावसाने मुंबईची कशी केली आहे अवस्था...
बातम्या आणखी आहेत...