आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Raj Thackeray Now Supriya Sule On #MarathwadaDroughtVisit, Visited Chitte River Revival Work

औरंगाबाद: सुप्रिया सुळे म्हणाल्या, मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता संसदेत मांडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्याची भीषणता आपण संसदेत मांडणार आहोत, असे दुष्काळी स्थितीची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. - Divya Marathi
मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्याची भीषणता आपण संसदेत मांडणार आहोत, असे दुष्काळी स्थितीची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी आपल्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौ-याला सुरुवात केली. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व अनेक पदाधिका-यांनी या दौ-यात सहभाग घेतला आहे.
औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर असा दोन दिवसांचा त्यांचा दौरा आहे. या जिल्हयांत सुप्रियाताई शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर विविध प्रकल्पांची पाहणीही त्या करणार आहेत. औरंगाबादच्या रोटी कपडा बँकेला भेट देऊन सुप्रिया सुळे यांनी आजपासून या दौ-याला सुरुवात केली. त्यानंतर पैठणजवळील चित्ते नदी पुनर्निर्माण प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली.
दौ-याला सुरुवात करताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार सुळे म्हणाल्या, मराठवाड्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. यावर विविध मार्गातून मात केली पाहिजे. तसेच मराठवाड्यातील बीअर कंपन्यांना पाणी द्यायचे की लोकांना पिण्यासाठी पाणी द्यायचे, याचा प्राधान्यक्रम सरकारने ठरवावा. मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्याची भीषणता आपण संसदेत मांडणार आहोत, असे दुष्काळी स्थितीची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनासही ही बाब आणणार असल्याचे त्या म्हणाल्या. पैठण तालुक्यातील पाचोड आणि परिसरातील 40 गावांत पाण्याचा प्रश्न भीषण आहे. हा प्रश्न चर्चेतून नक्की सोडवू. मात्र प्रश्न सोडवला नाही तर सर्वांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करू, असेही त्या म्हणाल्या. यापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या तेव्हा तत्कालीन सरकारविरोधात कलम ३०२ चा गुन्हा दाखल करा, असे म्हणणारे आता सरकारमध्ये आहेत. आता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे, अशा वेळी सरकारची भूमिका काय असणार आहे?”
भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी या मराठवाडा दुष्काळ दौ-याचे नियोजन केले आहे. राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याकरिता औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्त भागांना भेटी देतील. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट, यशस्विनी सामाजिक अभियान या संस्थांच्या वतीने लातूर, बीड आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळावा याकरिता अनेक उपक्रम सुरु करण्यात आलेले आहेत. या दौऱ्यादरम्यान सुळे यातील काही उपक्रमांची पाहणी करणार आहेत, तसेच नवीन उपक्रमांची सुरुवात करणार आहेत.
सुप्रिया सुळेंच्या आजच्या (21 एप्रिल) दौ-याचे नियोजन
- सकाळी 8 वाजता- औरंगाबाद येथील हारून मुकाती इस्लामिक सेंटरच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या रोटी आणि कपडा बँक येथे भेट
- सकाळी 9.30 वाजता- पाचोड, ता. पैठण येथे ग्रामविकास संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास भेट
- सकाळी 11 वाजता- समर्थ सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर येथे दिवंगत माजी खा. अंकुशराव टोपे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन
- दुपारी 12 वाजता- बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आमदार अमरसिंह पंडित यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांना भेट देऊन पाहणी करतील तसेच उपस्थित शेतकऱ्यांसोबत संवाद
- दुपारी 2 वाजता- बीड नगरपालिकेच्या वतीने उभ्या करण्यात येत असलेल्या निराधार निवारा गृहाचे भूमिपूजन करतील.
- दुपारी 3.30 वाजता- राष्ट्रवादी भवन, बीड येथे पत्रकारांसमवेत संवाद
- सायंकाळी 4.30 वाजता- बीड- अंबाजोगाई रस्त्यावरील चारा छावण्यांना भेट देत शेतकऱ्यांसोबत चर्चा
- सायंकाळी 6 वाजता- अंबाजोगाई येथील विहीर पुनरुज्जीवन प्रकल्पास भेट
- सायंकाळी 6.30 वाजता- यशस्विनी सामाजिक अभियानाच्या वतीने आयोजित दुष्काळग्रस्त एकल महिलांच्या सहाय्यता कार्यशाळेत उपस्थिती.
- अंबाजोगाई येथे मुक्काम.
पुढे आणखी पाहा व वाचा, सुप्रिया सुळेंच्या दुष्काळी दौ-याबाबत....