आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरेंच्या दणक्यानंतर ठाणे पोलिस नरमले, 1 कोटीवरून 1 लाखावर दंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज ठाकरे यांनी शनिवारी (18 नोव्हेंबर) ठाण्यातील सभेत ठाणे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ठोठावलेल्या १ कोटी रूपयांच्या दंडाबाबत जाहीर वाच्यता करताच ठाणे पोलिस नरमले आहेत. तुमच्यावर जेव्हा गुन्हे दाखल होतील तेव्हा आम्हीही आमच्या औकातीप्रमाणे 200 कोटींचे दावे ठोकू, असा इशारा राज यांनी दिला होता. यानंतर ठाणे पोलिसांनी दंडाची रक्कम 1 कोटी रूपयांवरून थेट 1 लाखांवर खाली आणली. 

 

मनसेने मागील महिन्यात फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी ठाण्यातील मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना 1 कोटी रूपयांचा तर इतर 25 कार्यकर्त्यांना प्रत्येकी 25 लाख रूपयांचा दंड ठाणे पोलिसांनी ठोठावला होता. यानंतर राज यांनी ठाण्यातील जाहीर सभेत ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना चांगलाच सुनावले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, अनधिकृत फेरावाल्यांना हटवले तर माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून 1 कोटींचे दावे ठोकता मग पोलिसांवर हात उचलणारे आणि महिला पोलिसांचा विनयभंग करणा-यांवर दावे का ठोकत नाही असा सवाल उपस्थित केला होता. 

 

मनसेच्या कार्यकर्ते सराईत गुन्हेगार नाहीत. त्यांच्यावरील गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत. त्यामुळे पोलिसांनी धाडलेल्या नोटिसी आम्हाला लागू होत नाहीत असा युक्तिवाद मनसेने केला होता. पोलिसांच्या या नोटिसीला मनसेने कोर्टात आव्हान दिले आहे. तेथे त्यांना आपले म्हणणे आणि युक्तीवाद करायचा आहे. कोर्ट यावर पुढील काही दिवसात सुनावणी घेणार आहे. तोपर्यंत अटक आणि दंड भरण्यास स्थगिती दिली आहे. मात्र, त्याआधीच पोलिसांनी राज यांच्या गर्जनेनंतर नांगी टाकली आहे.  तर ठाणे पोलिसांनी मनसेने केलेल्या विनंतीला मान देत दंडाची रक्कम १ कोटीवरून  १ लाख रूपये केल्याचे हायकोर्टात सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...